भीमरूपी महारुद्रा, वज्रहनुमान मारुती | वनारी अंजनीसूता रामदूता प्रभंजना ||१|| महाबळी प्राणदाता, सकळां उठती बळें | सौख्यकारी दुखःहारी, दूत वैष्णवगायका ||२|| दीनानाथा हरीरूपा, सुंदरा जगदांतरा | पातालदेवताहंता, भव्यसिंदूरलेपना ||३|| लोकनाथा जगन्नाथा, प्राणनाथा पुरातना | पुण्यवंता पुण्यशीला, पावना परितोषिका ||४|| ध्वजांगे उचली बाहो, आवेंशें लोटला पुढें | काळाग्नी काळरुद्राग्नी, देखतां कांपती भयें ||५|| ब्रह्मांडे माईली नेणो, आंवळे दंतपंगती | नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा, भुकुटी ताठिल्या बळें ||६|| पुच्छ ते मुरडिले माथां, किरीटी कुंडले बरीं | सुवर्ण कटी कांसोटी, घंटा किंकिणी नागरा ||७|| ठकारे पर्वता ऐसा, नेटका सडपातळू | चपळांग पाहतां मोठे, महाविद्युल्लतेपरी ||८|| कोटिच्या कोटि उड्डाणें, झेपावे उत्तरेकडे | मंद्रादिसारखा द्रोणू, क्रोधे उत्पाटिला बळें ||९|| आणिला मागुतीं नेला, आला गेला मनोगती | मनासी टाकिले मागे, गतीसी तुळणा नसे ||१०|| अणूपासोनि ब्रह्मांडाएवढा होत जातसे | तयासी तुळणा कोठे, मेरु मंदार धाकुटे ||११|| ब्रह्मांडाभोवते वेढे, वज्रप...